Blog

चुकीचा रिटर्न भरल्यास नोटीस ऐवजी आता थेट होणार वसुली, वाचा का होणार कारवाई

कोणतीही चूक न करता जीएसटी रिटर्न (GST Return) भरणं आता फायद्याचं ठरणार आहे, तर चुका करणं महागात पडणार आहे. चुकीचा जीएसटी रिटर्न भरणे नवीन वर्षात महागात पडणार आहे. 1 जानेवारीपासून वस्तू आणि सेवा कर अधिकारी चुकीचा जीएसटी रिटर्न भरणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध वसुलीसाठी थेट पावले उचलू शकतात. चुकीची बिले दाखवण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी यामुळे मदत होईल. अनेकदा तक्रार केली जाते की मासिक GSTR-1 फॉर्ममध्ये जादा विक्री दाखवणारे व्यवसायिक कर दायित्व कमी करण्यासाठी पेमेंट संबंधित GSTR-3B फॉर्ममध्ये तसाच अहवाल देतात.

पंजाब केसरीच्या वृत्तानुसार, सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी वित्त विधेयकात या बदलाची तरतूद केली होती. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) 21 डिसेंबर रोजी GST कायद्यातील सुधारणा अधिसूचित केल्या. त्यानंतर 1 जानेवारी 2022 पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

यापूर्वी अशी तफावत समोर आल्यावर जीएसटी विभागाकडून नोटीस बजावली जायची आणि त्यानंतर वसुलीची प्रक्रिया सुरू व्हायची, मात्र नियम बदलल्यानंतर अधिकारी थेट वसुलीची प्रक्रिया सुरू करू शकतात.

एएमआरजी अँड असोसिएट्सचे वरिष्ठ भागीदार रजत मोहन यांच्या मते, जीएसटी कायद्यातील हा बदल अतिशय कडक आहे आणि जीएसटी विभागाला वसूली करण्याचे विशेष अधिकार देतो. त्यांनी असेही म्हटले की, या नव्या तरतुदीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.

courtesy by – lokmat.news18

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *